Advertisement

अशी रंगली होम मिनिस्टरची मकरसंक्रांत!


अशी रंगली होम मिनिस्टरची मकरसंक्रांत!
SHARES

मुंबई - महाराष्ट्रातील घराघरांत लोकप्रिय असलेली आणि ज्यात आपणही सहभागी व्हावं असं प्रत्येक महिलेचं स्वप्न असलेला कार्यक्रम म्हणजे 'होम मिनिस्टर'. संध्याकाळी 6.30 ची वेळ ही प्रत्येक घरासाठी हक्काची असते. आपली हीच लोकप्रियता टिकवत हा कार्यक्रम आजही प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी देत आहे.

सणाच्या निमित्ताने सादर होणाऱ्या भागांचं वैशिष्ट्य तर काही औरच. वर्षाच्या सुरुवातीला येणारा पहिला मराठी सण म्हणजे मकरसंक्रांत. या गोड सणानिमित्त होम मिनिस्टरचा एक खास सोहळा प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. ज्यात सहभागी होणार आहेत झी मराठीवर सध्या सुरु असलेल्या लोकप्रिय मालिकांमधील तुमच्या आवडत्या प्रमुख जोड्या. येत्या रविवारी सायंकाळी ७ वा. हा सोहळा झी मराठीवरुन प्रसारित होणार आहे.

डोंबिवली जिमखानामधील मैदानावर होम मिनिस्टरचा हा संक्रांत स्पेशल खेळ रंगला. ज्यात झी मराठीच्या नायक नायिकांसह सामान्य महिलांनाही सहभागी होण्याची आणि पैठणीचा मान जिंकण्याची संधी मिळाली.

‘जय मल्हार’ मालिकेतील खंडोबाची भूमिका साकारणारे देवदत्त नागे आणि बानूची भूमिका साकारणारी ईशा केसकर, ‘माझ्या नव-याची बायको’ मधील राधिका - अनिता दाते, शनाया - रसिका, गुरुनाथ - अभिजित खांडकेकर, ‘खुलता कळी खुलेना’ मधील विक्रांत - ओमप्रक्राश शिंदे, मानसी - मयुरी देशमुख, मोनिका - अभिज्ञा भावे,

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा