Advertisement

नंदू माधव व देविका दफ्तरदार पहिल्यांदाच एकत्र


नंदू माधव व देविका दफ्तरदार पहिल्यांदाच एकत्र
SHARES

नेमक्याच तरीही प्रभावी भूमिका करण्याकडे ओढा असणाऱ्या कलाकारांमध्ये अभिनेता नंदू माधव, अभिनेत्री देविका दफ्तरदार ही नावं आवर्जून घेतली जातात. आतापर्यंत मोजक्या पण 'हटके' चित्रपटांमध्ये दिसणारे हे दोन चतुरस्त्र कलाकार योगायतन फिल्मस् प्रस्तुत 'परी हूँ मैं' या आगामी मराठी चित्रपटातून पहिल्यांदाच जोडीच्या रूपाने प्रेक्षकांसमोर येत आहेत. चित्रपटाची कथा इरावती कर्णिक यांची आहे. या चित्रपटाचे निर्माते डॉ. राजेंद्र प्रताप सिंह असून दिग्दर्शक रोहित शिलवंत आहेत.

'परी हूँ मैं' या चित्रपटात एका मध्यमवर्गीय कुटुंबाचा ध्येयापर्यंतचा पॅशनेबल प्रवास मांडण्यात आला आहे. कौटुंबिक नाट्य असणाऱ्या या चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरुवात झाली आहे. नंदू माधव आपल्याला या सिनेमात कुटुंबवत्सल पती, प्रेमळ वडील अशा भूमिकेत दिसणार असून कुटुंबाच्या पाठिशी ठामपणे उभी राहणाऱ्या आईची व्यक्तिरेखा देविका दफ्तरदार साकारणार आहेत. मराठी चित्रपटसृष्टीत आता विविध प्रयोग होताना दिसत आहेत. मराठी सिनेमाच्या सशक्त आशयामुळे अमराठी निर्माते आणि प्रस्तुतकर्त्यांची रेलचेल मराठीत वाढताना दिसून येत आहे. निर्माते डॉ. राजेंद्र प्रताप सिंह यांच्या 'परी हूँ मैं' या चित्रपटातील आमची केमिस्ट्री प्रेक्षक नक्कीच एन्जॉय करतील असा विश्वास या दोघांनी व्यक्त केला. नंदू माधव, देविका दफ्तरदार व्यतिरिक्त या चित्रपटात श्रुती निगडे, फ्लोरा सैनी आदींच्या प्रमुख भूमिका आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा