Advertisement

अभिनेत्री पूजा सावंत प्रेग्नंट ?


अभिनेत्री पूजा सावंत प्रेग्नंट ?
SHARES

अभिनेत्री पूजा सावंतकडे सध्या अनेक दिग्दर्शकांची रांग लागली आहे. त्यामुळे तिच्या हातात अनेक चित्रपट देखील आहेत. तिच्या सौंदर्य आणि अभिनयावर मराठी तरुणाई घायाळ झाली असताना पूजा सावंत चक्क 'प्रेग्नंट' असल्याची बातमी समोर आली आहे. सोशल नेट्वर्किंग साईटवर तिचा एक फोटो लिक झाला असून, त्यात ती गरोदर असल्याचे दिसत आहे. तसेच सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येत्या १४ जुलैची ड्यू डेट तिला देण्यात आली आहे. या बातमीमुळे पूजाच्या चाहत्यांना अर्थातच शॉक बसला असेल. योगायोग म्हणजे तिचा आगामी सिनेमा 'लपाछपी' हा देखील १४ जुलैला प्रदर्शित होत आहे. त्यामुळे मराठीतील ही 'कलरफुल' अभिनेत्री सध्या जास्तच बिझी असल्याचे दिसत आहे. पण तिच्या या प्रेग्नन्सीमागे वेगळंच गुपित आहे.


पूजा सावंत खऱ्या आयुष्यात प्रेग्नेंट नसून तिच्या आगामी 'लपाछपी' सिनेमातला हा फोटो आहे. प्रमोशनचा नवीन फंडा या सिनेमाने आजमावला आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच वायरल होतोय आणि सगळ्यांना गोंधळात टाकतोय.

संबंधित विषय
Advertisement