Advertisement

सईच्या डोळ्यांत का तरळले आनंदाश्रू?


सईच्या डोळ्यांत का तरळले आनंदाश्रू?
SHARES

मागील काही वर्षांपासून अभिनेत्री सई ताम्हणकर मराठीसोबत हिंदीतही खूप सक्रिय आहे. ग्लॅमरस लुकच्या जोडीला कसदार अभिनयाची जोड देत कोणतीही भूमिका यशस्वीपणे साकारणारी सई नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, ती डोळ्यांमध्ये आनंदाश्रू आल्याने.


आनंदाश्रू का तरळले?

असं काय घडलं? सईला इतका कसला आनंद झाला की तिच्या डोळ्यांत चक्क आनंदाश्रू तरळावेत? हा प्रश्न पडणं साहाजिक आहे. बऱ्याचदा चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र येणारी सई आणि दिग्दर्शक संजय जाधव यांची जोडी पुन्हा एकदा एकत्र आली ती कोणत्याही चित्रपटासाठी नव्हे, तर खेळाच्या मैदानावर. महाराष्ट्रात सध्या कुस्ती दंगलची धूम सुरू आहे. सई-संजय याच कुस्तीच्या मैदानावर एकत्र आले.


संजय आणि सईची संपूर्ण टीम बालेवाडीमध्ये कोल्हापूर मावळे विरूद्ध वीर मराठवाडा मॅचसाठी उपस्थित होती. सईच्या कोल्हापूर मावळे टीमला ४-२ अशा गुणांसह घवघवीत यश मिळाले. गेल्या काही दिवसांमधल्या मॅचेसमध्ये सोमवारी झालेली कोल्हापूर मावळेची लढत सर्वाधिक चुरशीची होती. टीम जिंकताच सईच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.


'सर्वाधिक चुरशीची लढत'

संघाच्या विजयानंतर जल्लोष करताना सई म्हणाली की, आजपर्यंत कुस्ती दंगलमध्ये झालेल्या सर्व लढतींपैकी सोमवारची लढत ही सर्वाधिक चुरशीची आणि मनोरंजक लढत होती. शेवटच्या क्षणापर्यंत आमच्या टीमच्या कुस्तीवीरांनी समोरच्या खेळाडूला मात देऊन यश मिळवलं. संजयदादा पहिल्यांदाच मॅच पाहायला आला. आणि आम्ही मॅच जिंकलो. मी नेहमी म्हणते, दादा माझा लकीचार्म आहे. आणि ते पुन्हा एकदा सिद्ध झालं. त्यामुळे आता मला जिंकवायला संजयदादाला प्रत्येक मॅचसाठी यावंच लागणार, असं सई मिश्किलपणे म्हणाली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा