मल्टीस्टाररचा 'बसस्टॉप' २१ जुलै ला प्रदर्शित

  Mumbai
  मल्टीस्टाररचा 'बसस्टॉप' २१ जुलै ला प्रदर्शित
  मुंबई  -  

  ऑनलाईन – बिनलाईन' आणि  ' बघतोस काय मुजरा कर ' या सिनेमांच्या यशानंतर तरुण चित्रपट निर्माता आणि मराठी गायक रॅपर श्रेयस जाधव ‘बसस्टॉप’ हा सिनेमा घेऊन येत आहे. अमृता खानविलकर, अनिकेत विश्वासराव, हेमंत ढोमे, सिद्धार्थ चांदेकर, पूजा सावंत, रसिका सुनील, अक्षय वाघमारे, मधुरा देशपांडे, सुयोग गोरे, अविनाश नारकर,संजय मोने, शरद पोंक्षे, उदय टिकेकर, विद्याधर जोशी हे प्रमुख भूमिकेत आहेत.

  गणराज असोशिएट्स प्रस्तुत या सिनेमाचे दिग्दर्शन समीर हेमंत जोशी यांनी केलं असून पूनम शेंडे, गजेंद्र पाटील, आसू निहलानी या निर्मात्यांची देखील यात महत्वाची भूमिका आहे. गतवर्षाचे राज्य पुरस्कार विजेते अभिजित अब्दे यांच्या कॅमे-यातून यांनी  या चित्रपटाचे चित्रीकरण केले आहे. शिवाय तरुणांचे आवडते संगीतकार जसराज, हृषीकेश, सौरभ यांनी संगीत दिले आहे. ‘बसस्टॉप’ हा सिनेमा २१ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे..


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.