Advertisement

मच्छिंद्र चाटे दिग्दर्शित 'तु.का.पाटील' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला


मच्छिंद्र चाटे दिग्दर्शित 'तु.का.पाटील' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
SHARES

मराठी चित्रपटाला दिशा देणारे 'बिनधास्त' (१९९९)आणि 'चिमणी पाखरं' (२००१) हे चित्रपट देवयानी मुव्हीजने बनवले होते. त्यांना मराठी प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. आता देवयानी मुव्हीजचा आगामी चित्रपट 'तु.का.पाटील' चित्रीकरणासाठी सज्ज झालेला आहे .या चित्रपटाचे दिग्दर्शन  मच्छिंद्र चाटे हे करणार आहेत. नुकताच 'तु.का.पाटील' या चित्रपटाचा मुहूर्त समारंभ १० मे रोजी दादर येथील कोहिनूर हॉटेलमध्ये दिमाखात पार पडला. 'तु.का.पाटील' या चित्रपटाचे कथानक ग्रामीण महाराष्ट्रात घडते. 'तु.का.पाटील' या चित्रपटात १७ गाणी आहेत. त्यापैकी १४ गाणी योगीराज माने यांनी लिहिली आहेत. उर्वरित ३ गीते ही मराठी पारंपारिक गीते नवीन चालीत तयार करण्यात आली आहेत.

या चित्रपटात सुरेश वाडकर, राजेश सरकटे, स्वप्नील बांदोडकर, नीतिन सरकटे, आशीष नाटेकर, साधना सरगम, अमृता फडणवीस, बेला शेंडे, वैशाली देशमुख, संगीता भावसार, नेहा वैष्णव, राणी तरारे यांनी पार्श्वगायन केले आहे.चित्रपटाचे नृत्यदिग्दर्शन कीशु पाल, समाधान सल्गर, संदेश पाटील हे करत आहेत. या चित्रपटात नागेश भोसले, प्रिया बेर्डे, मैथिली जावकर, उपेँद्र लिमये, जितेंद्र जोशी, भार्गवी चिरमुले, सुरेखा पुणेकर, भारती नाटेकर, स्मिता शेवाळे, सिद्धेश्वर झाडबुके, संदीप पाठक, संजना  नारकर, अशोक शिंदे, अमृता फडणवीस, राजेश सरकटे हे सर्व आघाडीचे कलाकार भूमिका साकारत आहेत. मनिष नाटेकर व प्रतीक्षा शिर्के हे नवोदित कलाकार प्रथमच पदार्पण करत आहेत.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा