Advertisement

इंक आर्टमधून साकारलं 'ग्रहण'चं शीर्षक गीत!


इंक आर्टमधून साकारलं 'ग्रहण'चं शीर्षक गीत!
SHARES

मराठी मालिकांमध्ये मालिकेच्या कथानकाइतकंच मालिकेचं शीर्षक गीतही तितकंच महत्त्वाचं असतं. अगदी मालिका संपली, तरी ही शिर्षक गीतं प्रेक्षकांच्या मनात घोळतात. 'वादळवाट' असो किंवा 'आभाळमाया' असो. अशा अनेक जुन्या मालिकांची शिर्षक गीतं प्रेक्षकांची तोंडपाठ आहेत.

'ग्रहण' या मालिकेप्रमाणेच त्याचं शिर्षक गीतही कलेच्या अनोख्या पद्धतीने प्रेक्षकांसमोर आणलं आहे. या शीर्षक गीतात इंक आर्टचा वापर करण्यात आला आहे. या इंक आर्टच्या मेकिंगचा व्हिडिओ झी मराठीच्या फेसबुक पेजवरून प्रेक्षकांसमोर आला आहे. विक्रांत शिंतोळे यांच्या कल्पनाशक्तीतून ही कलाकृती साकारली आहे.



एका शाईच्या ओघळाने सुंदर कलाकृती निर्माण होऊ शकते, याचं उत्तम उदाहरण म्हणजे 'ग्रहण' मालिकेचं शिर्षक गीत! या सुंदर गीताला देवकी पंडीत यांचा आवाज लाभला आहे. तर अशोक पत्की यांचं संगीत ही या शीर्षकगीताची जमेची बाजू. गीत, संगीत आणि इंक आर्ट या तिनही गोष्टी जमून आल्यामुळे ही दृष्य प्रेक्षकाला एका जागी खिळवून ठेवतात.

या आधी 'खुलता कळी खुलेना' या मालिकेच्या शिर्षक गीतासाठी सॅण्ड आर्टचा तर 'चुक भूल दयावी घ्यावी' या मालिकेच्या शिर्षक गीतासाठी कार्टून आर्टचा वापर करण्यात आला होता.




हेही वाचा

असा आहे धकधक गर्लचा 'बकेट लिस्ट'!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा