मृणाल निघाली सासरला...

 Mumbai
मृणाल निघाली सासरला...
Mumbai  -  

'अस्सं सासर सुरेख बाई' म्हणत मृणाल दुसानिस ने अवघ्या महाराष्ट्रातील प्रेक्षकांची मन जिंकली . पण आता मृणाल आपल्या खऱ्या सासरी म्हणजेच अमेरिकेला चालली आहे. घाबरू नका तिची मालिका बंद होत नाहीये तर पूर्ण १ महिना सुट्टी घेऊन ती आपल्या सासरी जाणार आहे. ती इथे नसली तरी तिच्या चाहत्यांना मालिकेत मात्र ती पाहायला मिळणार आहे. कारण सुट्टी जरी घेतली असली तरी तिने आधीच आपलं १ महिन्याचं शूट संपवलं आहे.

गेल्याच वर्षी मृणालच लग्न झालं आहे. तिचा नवरा नीरज मोरे हा अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे. गणेशोत्सवात नीरज काही दिवसांसाठी भारतात आला होता पण बीझी शेड्युलमुळे मृणालला तिच्या सासरी जाता येत नव्हतं पण आता १ महिना का होईना मृणाल आपल्या सासरी निघालीये.  


Loading Comments