Advertisement

मुंबईतल्या डब्बेवाल्यांकडून इरफान खानला श्रद्धांजली, 'लंच बॉक्स' चित्रपटातल्या आठवणींना दिला उजाळा

अभिनेता इरफान खाननं मुंबईच्या डब्बावाल्यांसोबत 'लंच बॉक्स' या चित्रपटात काम केलं आहे.

मुंबईतल्या डब्बेवाल्यांकडून इरफान खानला श्रद्धांजली, 'लंच बॉक्स' चित्रपटातल्या आठवणींना दिला उजाळा
SHARES

अभिनेता इरफान खानच्या निधनावर सर्वच स्तरातून दु:ख व्यक्त केलं जातंय. केवळ बॉलिवूडच नाही तर मुंबईचे डब्बेवाला देखील हळहळ व्यक्त करत आहेत. इरफान खान केवळ एक चांगला अभिनेताच नाही तर खूप चांगला माणूस होता. या शब्दात डब्बेवाल्यांनी आपल्या भावना व्यक्त करत इरफानला श्रद्धांजली वाहिली आहे.

अभिनेता इरफान खाननं मुंबईच्या डब्बावाल्यांसोबत 'लंच बॉक्स' या चित्रपटात काम केलं आहे. या चित्रपटानंतर डबेवाले इरफान खानचे चाहतेच झाले. इरफानच्या निधनानंतर डब्बेवाल्यांनी देखील दु:ख व्यक्त केलं आहे. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यानं डब्बावालाच्या टीमच्या जेवणाची आणि सुविधांची विशेष काळजी घेतली होती.

"इरफान प्रत्येकाची विचारपूस करायचा. आम्ही लगेज डिपार्टमेंटमध्ये काम करायचो तर ते दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये काम करायचे. तरीही ते आमच्याकडे येऊन आमची चौकशी करायचे. प्रत्येकाशी अतिशय प्रेमानं बोलायचे. त्याच्या या साधेपणानं आणि नम्र स्वभावामुळे आम्ही भारावून गेलो होतो. बॉलिवूडनं एक कसदार अभिनेताच नव्हे तर चांगला माणूसही गमावला आहे," अशी भावनाही डबेवाल्यांनी व्यक्त केली.

२०१३मध्ये इरफानचा लंच बॉक्स हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमात त्याने विधूर व्यक्तीची व्यक्तिरेखा साकारली होती. या सिनेमात तो एक सरकारी कर्मचारी असतो आणि रोज डब्बेवाल्यांकडून टिफिन घेत असतो.

अभिनेता इरफान खाननं बुधवारी मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात वयाच्या ५४व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. इरफान बऱ्याच दिवसांपासून आजारी होता. यापूर्वी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयाच्या निवेदनात म्हटलं आहे की, इरफान खानला पोटाचा आजार होता. त्याला आतड्यामध्ये संक्रमण झाले होते. चित्रपट दिग्दर्शक शुजित सरकार यांनी प्रथम इरफान खानच्या मृत्यूची माहिती दिली आणि त्यानंतर रुग्णालयातून निवेदन देण्यात आलं.



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा