Advertisement

‘हलाल’ चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा संपन्न


‘हलाल’ चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा संपन्न
SHARES

सध्या तिहेरी तलाकचा मुद्दा गाजत आहे. त्यातच लेखक संजय पवार यांचा मुस्लिम विवाह संस्थेवर भाष्य करणाऱ्या 'हलाल' या सिनेमाचा म्युझिक लॉन्च सोहळा नुकताच पार पडला आहे. या सिनेमाची सध्या बरीच चर्चा आहे.

कथेचा आशय गडद करणारी ‘मौला मेरे  मौला’, सैयां ही दोन गीते व त्याला साजेसं पार्श्वसंगीत या चित्रपटातील गीतांना लाभलं आहे. चित्रपटाची गीते सुबोध पवार व सय्यद अख्तर यांनी लिहिली असून संगीताची जबाबदारी विजय गटलेवार यांनी सांभाळली आहे. गायक आदर्श शिंदे, सय्यद अख्तर, विजय गटलेवार यांचा स्वरसाज या चित्रपटाला लाभला आहे.



राष्ट्रीय पुरस्कार विजेते लक्ष्मण कागणे व अमोल कागणे यांनी या सिनेमाची निर्मिती केली असून दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिवाजी लोटन पाटील यांचे आहे.

अभिनेता चिन्मय मांडलेकर, प्रितम कागणे, प्रियदर्शन जाधव, विजय चव्हाण, छाया कदम, संजय सुगावकर, अमोल कागणे, विमल म्हात्रे या कलाकारांच्या 'हलाल'मध्ये भूमिका आहेत. येत्या ६ ऑक्टोबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.  



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा