Advertisement

‘माझा एल्गार’ चित्रपटाचा शानदार म्युझिक लॉन्च सोहळा


‘माझा एल्गार’ चित्रपटाचा शानदार म्युझिक लॉन्च सोहळा
SHARES

गेल्या काही वर्षांमध्ये मनोरंजनापलीकडे चित्रपटांतून अभिव्यक्तीचा शोध घेणारे मराठी चित्रपट मोठ्या संख्येने दिसत आहेत. त्याच धाटणीचा भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध एका स्त्रीने केलेल्या संघर्षाची कहाणी सांगणारा ‘माझा एल्गार’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा शानदार संगीत अनावरण सोहळा नुकताच संपन्न झाला. ‘माझा एल्गार’ चित्रपटाचे निर्माते सौरभ आपटे असून चित्रपटाची कथा व दिग्दर्शन मिलिंद कांबळे यांचं आहे.



‘माझा एल्गार’ चित्रपटात वेगवेगळ्या प्रकारची चार गीते आहेत. ‘बा इठ्ठला तुझं रूप दाव रं’ या मनाचा ठाव घेणाऱ्या गीताला आदर्श शिंदे यांनी स्वरसाज दिला आहे. ‘थांब ना...अजून क्षणभर थांबना’ हे प्रेमगीत सौरभ शेटे व आनंदी जोशी यांनी गायले आहे. ‘अन्याय तुडवण्यासाठी’ या स्फूर्तीदायक गीताला सौरभ शेटेचा आवाज लाभला आहे. ‘आयना का बायना’ हे जोशपूर्ण गाणं अवधूत गुप्तेनं गायलं आहे. अभिजीत सकपाळ व मिलिंद कांबळे यांनी ही गीते लिहिली आहेत.

ऐश्वर्या राजेश, स्वप्नील राजशेखर, यश कदम, अमोल रेडीज, अर्चना जोशी, ऋचा आपटे, गांधार जोशी प्रफुल्ल घाग, राजकिरण दळी, गोपाळ जोशी, सचिन सुर्वे, नितीन जाधव, पूजा जोशी, वैदेही पटवर्धन हे कलाकार यात आहेत. १० नोव्हेंबरला ‘माझा एल्गार’ चित्रपटगृहात दाखल होईल.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा