Advertisement

सिर्फ 'नाम शबाना'...बाकी घोर निराशा


सिर्फ 'नाम शबाना'...बाकी घोर निराशा
SHARES

नीरज पांडेचा 2015 मध्ये प्रदर्शित झालेला 'बेबी' सिनेमा प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला होता. याच सिनेमामध्ये साकारलेलेल्या (एजंट) शबाना वर आधारीत बेबी सिनेमाचा हा प्रीक्वेल आहे. बेबी सिनेमामध्ये शबानाची भुमिका पाहुण्या कलाकाराची होती. मात्र 148 मिनिटांचा हा सिनेमा एवढा काही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नव्हता. बेबीमध्ये नेपाळला जाऊन एजंटशी दोन हात करणारी शबाना. तिची बॅकस्टोरी सांगताना तिच्या मानसिकतेचा तळ गाठण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. या सिनेमात तापसी पन्नू आहे. तिच्यासोबतीला मनोज वाजपेयी. मात्र हा सिनेमा एकट्या तापसीचा आहे. यासाठी तिने मेहनतही तितकीच घेतली आहे. बेबीसारखाच हा सिनेमा पहिल्या पासून प्रेक्षकाला खिळवून ठेवतो.

या सिनेमात शबाना खान (तापसी पन्नू) एक एजंट आहे. तिचं जय (तेहर शब्बीर)सोबत प्रेम होतं. मात्र काही गुंड तिची छेड काढताना जय तिला वाचवायला जातो आणि त्यातच तो मरण पावतो. यानंतर शबाना स्वत:मध्ये बदल करण्याचा निर्णय घेते आणि सुरु होतो एक एजंट म्हणून तिचा प्रवास. मनोज वाजपेयी याच्यासोबत बोलताना तिला एजेंसी(रॉ) मध्ये येण्याचा प्रस्ताव ठेवला जातो. एका तथाकथित ड्रग डिलर आणि हत्यारं विकणाऱ्यांना पकडण्यासाठी मिशन आखलं जातं. ज्यामध्ये शबाना देखील सहभागी होते. या मिशनमध्ये काय होतं? टीम तिला कसं शोधते? शबानाने काय केलं? या सगळ्या प्रश्नांची उत्तर शोधताना एक वेगळाच प्रयत्न दिग्ददर्शक करतो आणि इथेच सिनेमा फसतो.

सिनेमात तापसी शिवाय कोणीही आपली छाप पाडू शकलेला नाही. सिनेमाच्या पूर्वार्धात तापसी आणि तिचं प्रेम प्रेक्षकांना भावतं. मात्र जेव्हा हे सगळं संपतं तेव्हा वास्तविकता सुरु होते. मात्र दिग्ददर्शक उत्तरार्धात सपशेल अपयशी ठरतो.

विशेष म्हणजे अक्षय कुमार याचा कैमियो देखील प्रेक्षकांवर प्रभाव पाडू शकलेला नाही. एकूणच काय तर नावाप्रमाणेच फक्त शबानाशिवाय सिनेमात कुणीही प्रभाव टाकू शकलेलं नाही.

कलाकार - तापसी पन्नू, मनोज वाजपेयी, अक्षय कुमार(कॅमिओ), पृथ्वीराज सुकुमारन आणि ताहेर शब्बीर

रेटिंग - 1.5/5

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा