ऑब्जेक्शन माय लव्ह...!

 Mumbai
ऑब्जेक्शन माय लव्ह...!

एकतर्फी प्रेमाची आठवण  वेगळीच असते. ते सांगता येत नाही, भासवता येत नाही. पण जेव्हा वेळ येते तेव्हा ते योग्य त्या व्यक्तीला सांगणे महत्वाचे असते आणि वेळ आली की ते निभावणेसुद्धा. ही गोष्ट आहे दोन अशा लोकांची जे आयुष्यातलं एक वळण संपल्यानंतर आज अनेक वर्षांनी पुन्हा एकमेकांसमोर पण एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत. प्रेम कधी कोणामध्ये आणि कोणत्या वळणावर होईल खरंच सांगू शकत नाही. 'प्रेम हे' ची सोमवारी येणारी नवीन गोष्ट आहे 'ऑब्जेक्शन माय लव्ह'.

दोन तरुण वकील प्रिया आणि निखिल त्यांच्या आयुष्यातील पहिली केस. दोघेही आपल्या आपल्या अशीलांसोबत केवळ विजयच मिळवायचा या इराद्याने कोर्टरूम मध्ये येतात. पण गोची तेव्हा होते जेव्हा त्यांना कळते की ते दोघेही कॉलेज फ्रेंड्स आहेत आणि त्यातही निखिलचे प्रिया हे पहिले प्रेम आहे. तेव्हापासूनच या कथेत गंमतींना सुरु होते. त्यात विजय गोखलेंसारखा अवलिया हा जजच्या भूमिकेत आहेत. केस सुरु होते आणि प्रेम ही. आणि जसजशी केस पुढे पुढे जाते तसतसे प्रेमसुद्धा बहरत जाते. पण कोर्टातील प्रोफेशन वैयक्तिक आयुष्यात भारी पडते का? किंवा प्रेमामुळे प्रोफेशनवर परिणाम होतो. प्रेमाच्या आणाभाका घेतल्यानंतर प्रेम हे आयुष्यभर नेहमी तसेच राहते की वैयक्तिक अहंकार प्रेमावर भारी पडतो. अशा या सर्व भावभावनांनी गुंफलेली एक गमतीदार कोर्टरूम कहाणी आहे 'ऑब्जेक्शन माय लव्ह'.

'ऑब्जेक्शन माय लव्ह' ही झी युवाची संकल्पना असून स्नेहा चव्हाण आणि चेतन चिटणीस हे मुख्य भूमिकेत आहेत. विजय गोखले बऱ्याच काळानंतर छोट्या पडद्यावर दिसणार आहेत. त्याचबरोबर सुरेंद्र केतकर, मंजुषा जोशी, श्रीरंग दाते, ज्योतिक चितळेही आहेत. तर स्वप्नील गांगुर्डे यांच्या लेखणीतून कथा साकारली आहे आणि या गोष्टीचे दिग्दर्शन रघुनंदन बर्वे यांनी केले आहे.

२४ एप्रिल  आणि मंगळवार २५ एप्रिलला रात्री ९ वाजता स्नेहा चव्हाण आणि चेतन चिटणीस यांच्या तगड्या अभिनयाने सजलेली एक सुंदर निरागस भांडखोर प्रेमकथा झी युवावर पाहायला मिळेल.

Loading Comments