झी युवावर नवीन मालिका 'फुलपाखरू'

 Mumbai
झी युवावर नवीन मालिका 'फुलपाखरू'
Mumbai  -  

झी युवा वाहिनीद्वारे मराठी टेलिव्हिजनवर २२ ऑगस्ट २०१६ पासून एक नवे पर्व सुरु झाले आहे. झी युवा परिवाराचा अविभाज्य भाग बनलेल्या मालिका - बन मस्का, फ्रेशर्स, लव्ह लग्न लोचा, इथेच टाका तंबू, श्रावणबाळ, युवागिरी, शौर्य आणि हल्ली नवीन सुरु झालेले कार्यक्रम प्रेम हे आणि सरगम यांनी प्रेक्षकांना एक नवीन अनुभव नक्कीच दिला.

झी युवावर यापुढे येणाऱ्या नवीन कार्यक्रमांमध्ये एका नव्या रुपात, नव्या ढंगात नवीन विचारांना प्रोत्साहन देणारे, भविष्याकडे बघण्याचा नवीन दृष्टीकोन देणारे आणि आजच्या प्रेक्षकवर्गाशी साधर्म्य साधणारे कार्यक्रम याचे अजोड त्रिकुट एवढेच नव्हे तर नाते-संबंधांना नव्याने बघण्याची सुवर्णसंधी देणारे कार्यक्रम मराठी प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे. झी युवावरील कार्यक्रमांद्वारे प्रेक्षकवर्गाला दोस्ती - यारी, मज्जा - मस्ती,  हळूवार उमलणारं प्रेम, या सगळ्याच प्रकारची मेजवानी बघायला मिळणार आहे. तर सध्या झी युवावर आणखी एक नवीन मालिका दाखल होणार आहे. मालिकेचे नाव आहे 'फुलपाखरू'. प्रेम फुलपाखरासारखे असते. स्वतःचे फुल ते स्वतःच शोधते, अशी सुंदर वाक्यरचना असलेल्या या मालिकेचा प्रोमो तरुणाईत अतिशय वायरल झाला आहे. ज्यात वैदेही म्हणजेच अभिनेत्री ऋता दुर्गुळेच्या निरागस प्रेमाची गोष्ट असणार आहे. अजूनही या मालिकेमध्ये वैदेहीच्या प्रेमात नक्की कोण आहे? हे दाखवण्यात आलेले नाही. त्याचप्रमाणे इतर कोणकोणते कलाकार आहेत हे आपल्याला नवीन प्रोमोद्वारे लवकरच समजेल. ही मालिका २४ एप्रिल पासून सोमवार ते शुक्रवार, संध्याकाळी ७:३० वाजता झी युवावर आपल्याला पाहायला मिळेल.

Loading Comments