Advertisement

राधा प्रेम रंगे रंगलीमध्ये रंजक वळण


राधा प्रेम रंगे रंगलीमध्ये रंजक वळण
SHARES

अल्पावधितच प्रेक्षकांची आवडती झालेली 'राधा प्रेम रंगी रंगली' या मालिकेचे १०० भाग पूर्ण झाले. या मालिकेच्या पहिल्या भागापासूनच प्रेम आणि राधा समोर अनेक अडचणी आणि आव्हाने आली. यापुढेही या दोघांच्या अडचणी वाढतच जातील. आणि राधा-प्रेम हे दोघेही यातून मार्ग काढतील यात शंका नाही.

एकीकडे दीपिकाची बळजबरी आणि दुसरीकडे राधाचा असलेला विश्वास तसेच आईला दिलेलं वचन यामध्ये प्रेम पूर्णपणे अडकलेला आहे. श्रावणी काकुच्या वारंवार अन्विताला घालून पाडून बोलण्याला कंटाळून आदित्यने तिला घराबाहेर काढलं होतं. राधा आणि प्रेमला हे कळताच ते श्रावणी काकुला शोधायला घराबाहेर पडतात. राधाच्या सांगण्यावरून श्रावणी काकु घरी येण्यास संमती देते आणि घरी येते देखील.


मालिकेला रंजक वळण

पण, आता येणाऱ्या भागांमध्ये प्रेम आणि राधाच्या वाढत्या मैत्रीला लक्षात घेऊन दीपिका आणि तिची आई प्रेमला एका तासाची मुदत देणार आहे. आता प्रेम कुठला मार्ग स्वीकारणार? आईला दिलेलं वचन कसं पूर्ण करणार? राधाचा प्रेमवर असलेला विश्वास कायम रहाण्यासाठी प्रेम काय करणार? हे बघणे आता रंजक असणार आहे.


पुढच्या भागात काय?

राधा आणि प्रेमची वाढती मैत्री बघून दीपिकाला प्रेम आणि राधाच्या नात्यावर संशय येतो. येणाऱ्या भागांमध्ये दीपिका आणि तिची आई प्रेमला एका तासाची मुदत देतात, या एका तासात प्रेमने राधाला घटस्फोट नाही दिला तर त्याचा व्यवसाय आणि त्याचे वैयक्तिक आयुष्यदेखील धोक्यात येईल, अशी धमकी ते प्रेमला देतात. प्रेम दीपिका आणि तिच्या आईच्या धमकीमुळे खूप गोंधळून जातो. दीपिका गरोदर आहे पण हे बाळ खरोखरच प्रेमचं आहे का? की, प्रेमला अडकवण्यासाठी दीपिका प्रेमशी खोटं बोलते आहे? प्रेमच्या मनात असणारे हे प्रश्न तो राधाला सांगेल का? राधाचं यावर काय म्हणणं असेल? असे अनेक प्रश्न प्रेमला पडणार आहेत.

या संकंटामधून कसा मार्ग काढावा? या अडचणीतून बाहेर येण्यासाठी प्रेम राधाला विश्वासात घेऊन त्याच्या भावना व्यक्त करेल का? राधा त्याला समजून घेईल का? प्रेमला राधाची साथ मिळेल का? हे जाणून घेण्यासाठी राधा प्रेम रंगी रंगलीचे पुढील भाग अजिबात चुकवू नका.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा