Advertisement

'राधा प्रेम रंगी रंगली' मालिकेच्या पुढील भागात काय?


'राधा प्रेम रंगी रंगली' मालिकेच्या पुढील भागात काय?
SHARES

कलर्स मराठीवरील 'राधा प्रेम रंगी रंगली' या मालिकेमध्ये प्रेमला एक कटू सत्य कळलं, ज्यामधून बाहेर पडण्यासाठी राधाने प्रेमला मदत केली.
हा मुलगा आपला नसून त्याला दत्तक घेतल्याने तो कधीच आपल्याला आई म्हणून स्वीकार करणार नाही, अशी भीती राधाला वाटत आहे.

राधाने याबाबतीत पुढाकार घेऊन माधुरीला मदत करण्याचा निर्णय घेते. यामुळेच राधा प्रेमला सत्य सांगते जे ऐकून प्रेम पूर्णपणे खचून जातो. इतकं मोठं सत्य का माझ्यापासून लपवून ठेवलं हे त्याला कळत नाही आणि तो घराबाहेर निघून जातो. हे सगळं राधाने खूप सामंजसपणे हाताळलं, प्रेमला सांभाळून घेतलं. 

हे सगळं घडत असताना राधा प्रेमचा व्यवसाय देखील सांभाळण्यात त्याची मदत करत आहे. हे सगळं बघून प्रेमला आता कुठेतरी राधाबद्दल प्रेम वाटू लागलं आहे, आणि याचीच कबुली त्याने राधाला दिली. इतके दिवस मनामध्ये काय होत आहे? हे जरी कळलं नसलं तरीदेखील आता ते सत्य प्रेमला उमगलं असून त्याचं राधावर मनापासून प्रेम असल्याचं राधाला सांगितलं आहे.

राधा आणि प्रेमचा आता नवा प्रवास सुरू झाला आहे, असं म्हणायला हरकत नाही. परंतु, प्रेमच्या या कबुलीवर राधा तिच्या मनातील भावना प्रेमला सांगेल का ?की, दीपिकाच्या आईला दिलेला शब्द पाळण्यासाठी ती काहीच बोलणार नाही? राधासुद्धा प्रेमाची कबुली देणार? प्रेम-राधाचं नातं कुठल्या वळणावर येईल? हे बघणे रंजक असणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा