Advertisement

शंभूराजे, रामदास स्वामींची भेट घडणार का?


शंभूराजे, रामदास स्वामींची भेट घडणार का?
SHARES

'झी मराठी' वाहिनीवरील ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ ही मालिका आता उत्कंठावर्धक वळणावर पोहचली आहे. संभाजी महाराजांच्या जीवनातील दिलेरखान प्रकरण सुरू होण्यापूर्वी शंभूराजांना सज्जनगडावर समर्थ रामदासांची भेट घेण्यासाठी पाठवण्यात आलं होतं, असा उल्लेख अनेक पुस्तकांत आहे, तसं महाराजांचं एक पत्रही आहे. त्यामुळेच आता मालिकेत समर्थ रामदास स्वामी दिसणार का? याविषयी कुतुहल जागं झालं आहे.


पुढील भागात काय?

समर्थ रामदास स्वामींच्या शिवचरित्रातील भूमिकेविषयी अनेक मतमतांतरं असल्यामुळे हा टप्पा कशा पद्धतीनं पडद्यावर येणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. शुक्रवार १३ जुलै रोजी प्रसारीत होणाऱ्या भागात याचा उलगडा होईल. आता ‘स्वराज्यरक्षक संभाजी’मध्ये काय पाहायला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेनं नेहमीच समज-गैरसमजांच्या पलीकडे जाऊन नि:पक्षपातीपणे खरा इतिहास दाखवला आहे. मग ते गोदावरीचं प्रकरण असो, वा कलावंतीणीचं गाणं ऐकण्याचं. या सर्व गोष्टी मोठ्या शिताफीनं हाताळत खरा इतिहास मांडण्याचा प्रयत्न या मालिकेच्या माध्यमातून होत आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा