Advertisement

तुकाराम महाराजांना लागली विठ्ठल दर्शनाची आस


तुकाराम महाराजांना लागली विठ्ठल दर्शनाची आस
SHARES

कलर्स मराठी वाहिनीवर सुरू असलेली ‘तू माझा सांगातीं’ ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. संत तुकाराम महाराजांच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकणाऱ्या या मालिकेत तुकोबांना विठ्ठल दर्शनाची आस लागल्याचं पाहायला मिळणार आहे.

संसार आणि अध्यात्म यांचा अचूक मेळ साधत, मनामनाला भक्तीचा संदेश देणारे संत म्हणजे तुकाराम महाराज. तुकोबांच्या अभंगवाणीनं प्रत्येक मराठी मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. हजारहून अधिक भागांचा टप्पा यशस्वीपणे पार केलेली ही मालिका आता भक्तीच्या परमोच्च बिंदूवर येऊन पोहोचली आहे.


मालिकेत पुढे काय?

या मालिकेत आता तुकोबांना विठुरायाच्या दर्शनाची आस लागणार आहे. या मालिकेमध्ये आजवर संत चोखा मेळा, संत एकनाथ आणि नुकतीच संत सावता माळी यांची कथा बघायला मिळाली आहे. आता मालिका एका नव्या वळणावर येऊन पोहोचली आहे.

गावातील मंबाजी यांचं संत तुकारामांना नेहमी कमी लेखणं, त्यांच्या भक्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणं, त्यांच्यावर कुरघोडी करणं, अशा करामती सु्रूच असतात. आता हेच मंबाजी संत तुकाराम यांना डिवचण्यासाठी एक नवी युक्ती योजणार आहेत. ज्याद्वारे ते तुकोबांना विचारणार आहेत की, तुम्ही विठ्ठलाचं निस्सीम भक्त आहात, त्यांची सेवा करता; परंतु तुम्हाला अजून भगवंतानं दर्शन का दिलं नाही?

तुकोबा हे ऐकून खूप खचून जातात आणि घडलेली घटना आवलीला सांगतात. आवली यावरून मंबाजीला खूप सुनावते. विठ्ठलासमोर कधी न गेलेली आवली आपल्या पतीसाठी पहिल्यांदा भगवंतासमोर उभी ठाकते. तुकोबांना तुम्ही दर्शन का देत नाहीत? असा थेट सवाल ती विठ्ठलाला करते. तिला तिचं उत्तर मिळतं का? हे या मालिकेत पाहायला मिळेल.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा