Advertisement

संगीतप्रेमींसाठी भक्तीमय नजराणा 'बाप्पा मोरया'


संगीतप्रेमींसाठी भक्तीमय नजराणा 'बाप्पा मोरया'
SHARES

बाजारपेठा सजल्या, हायवेवर वाहनांची वर्दळ वाढली, चाकरमान्यांची घाई-गडबड सुरू झाली, निसर्गही साज-श्रृंगार लेऊन नटलाय... 'ऑल इज सेट फॅार वेलकम टू बाप्पा', असं म्हणत तरुण पिढीही विघ्नहर्ता गणरायाच्या स्वागताला सज्ज झाली आहे. या वातावरणात संगीत क्षेत्रासाठी कार्यरत असणाऱ्या पिकल म्युझिक कंपनीनंही पुढाकार घेत गणेशभक्तांसाठी एक आगळीवेगळा नजराणा पेश केला आहे. अल्पावधीतच संगीतप्रेमींच्या मनाचा ठाव घेण्यात यशस्वी झालेल्या समीर दीक्षित आणि ऋषिकेश भिरंगी यांच्या पिकल म्युझिकनं 'बाप्पा मोरया' हे गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करणारं गाणं रसिकांच्या सेवेत सादर केलं आहे.

'झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे...' या शब्दरचनांप्रमाणे मागील गणेशोत्सवाचे दिवस विसरून यंदाचा सोहळा आनंदात साजरा करण्याच्या उद्देशानं अतिशय सुंदर शब्दरचना असलेलं व तितक्याच सुरेल चालीत बांधलेलं गाणं निर्माते दत्ता मदन यांनी 'बाप्पा मोरया'च्या माध्यमातून सादर करण्यात आलं आहे. सध्याच्या काळात गणरायाची उडत्या चालीवरील धम्माल गाणी ऐकायला मिळतात. हे गाणं त्यापेक्षा खूप वेगळं आहे. विलेपार्ले येथील बस ईन स्टीडिओमध्ये रेकॅार्ड करण्यात आलेलं 'बाप्पा मोरया' हे गाणं पालघर येथील गणेश चित्रशाळेत चित्रित केलेलं आहे.

गीतकार समृद्धी पांडे यांच्या लेखणीतून अवतरलेलं हे गीत संगीतकार मयुरेश माडगांवकर यांनी संगीतबद्ध केलं आहे. दत्ता मदन यांनी हे गाणं गायलं असून, संगीत संयोजनही त्यांनीच केलं आहे. या गाण्यासाठी सनईवर ओमकार धुमाळ यांनी, तर तालवाद्यांवर चेतन परब यांनी साथ केली आहे. प्रोग्रामिंग प्रसाद परसनाईक यांनी केलं असून, बस ईन स्टुडिओतील सौरभ काजरेकर आणि विराट भूशेट्टी यांचं रेकॅार्डिंगसाठी सहकार्य लाभलं आहे. मिक्सिंग आणि मास्टरिंग केवल वाळंज यांनी केलं आहे, तर चलचित्रकार फिल्मचे सुशांत गावड हे व्हिडिओग्राफर आहेत. मनोज पाटील यांनी या गाण्याचे व्हिडिओ एडिटर म्हणून काम पाहिलं आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा