Advertisement

राज कुंद्राच्या घरातून ७० पॉर्न व्हिडिओ जप्त

राज कुंद्राच्या अडचणीत आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे.

राज कुंद्राच्या घरातून ७० पॉर्न व्हिडिओ जप्त
SHARES

राज कुंद्राच्या अडचणीत आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे. कारण गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी राज कुंद्राच्या घरी छापा मारला. त्यांनी या छाप्यामधून घरातील सर्व्हर आणि उमेश कामतनं तयार केलेले ७० पॉर्न व्हिडिओ जप्त केले आहेत.

क्राईम ब्रान्चमधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वेगवेगळ्या प्रॉडक्शन हाऊसच्या मदतीनं हे सर्व व्हिडिओ बनवण्यात आले होते. त्याशिवाय हॉट शॉट अॅपवर अपलोड केलेले २० ते ३० मिनिटांचे सुमारे ९० व्हिडिओ देखील पोलिसांच्या हाती लागले आहेत.

मुंबई गुन्हे शाखेनं राजची चौकशी केली असता या व्हिडिओबद्दल त्यानं माहिती दिली. हे व्हिडिओ उमेश कामतनं युकेमधील प्रॉडक्शन कंपनी केनरिनला पाठवले होते.

दरम्यान, आपण पॉर्न व्हिडिओ नाही तर अन्य ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या इरॉटिक व्हिडिओप्रमाणेच व्हिडिओ तयार करत असल्याचा दावा राज कुंद्रा करत आहे. पण पॉर्न व्हिडिओ तयार करत असल्याचे राज कुंद्राचा साथीदार आणि आयटी हेड रायन थार्प यानं मान्य केलं आहे.

तसंच या पूर्ण रॅकेटचा सूत्रधार कुंद्राच असल्याचंही त्यानं सांगितलं आहे. तसंच रायनचं काम केवळ कोणत्या तांत्रिक गोष्टींची काळजी घेत, कायद्यापासून पळवाट काढता येईल हे सांगायचं होतं. पोलिसांनी राज कुंद्राचे वियान इंडस्ट्रीज लिमिटेड आणि एलजी स्ट्रीमिंग या दोन्ही कार्यालयांवर पोलिसांनी छापे घातले आहेत.

पोलिसांच्या मते या प्रकरणातील आरोपींनी नवोदित मॉडेल, अभिनेत्री आणि अन्य मुलींच्या असहाय्य स्थितीचा फायदा घेत त्यांना अश्लिल चित्रपटांमध्ये काम करण्यास भाग पाडले. हे सर्व चित्रीकरण मुंबईत बंगले भाड्यानं घेऊन केले जायचे.



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा