Advertisement

अवघ्या ८ तासांत तिच्या डोळ्यांनी धुमाकूळ घातला!

बॉलिवूड, टॉलिवूड, हॉलिवूड आणि अजून कितीतरी चित्रपटसृष्टींमध्ये आजवर अनेक अभिनेत्री येऊन गेल्या. पण कुणाच्याही डोळ्यांची अवघ्या काही क्षणांची व्हिडिओ क्लिप तिला अवघ्या ८ तासांमध्ये इन्स्टाग्रामवर ४ लाख फॉलोअर आणि फेसबुकवर ५० हजार लाईक्स मिळवून देऊ शकत नाही.

अवघ्या ८ तासांत तिच्या डोळ्यांनी धुमाकूळ घातला!
SHARES

एका मुलीचे डोळे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.(आणि त्याहून जास्त कित्येक तरूणांच्या मनात!) बॉलिवूड, टॉलिवूड, हॉलिवूड आणि अजून कितीतरी चित्रपटसृष्टींमध्ये आजवर अनेक अभिनेत्री येऊन गेल्या. पण कुणाच्याही डोळ्यांची अवघ्या काही क्षणांची व्हिडिओ क्लिप तिला अवघ्या ८ तासांमध्ये इन्स्टाग्रामवर ४ लाख फॉलोअर आणि फेसबुकवर ५० हजार लाईक्स मिळवून देऊ शकत नाही.

या मुलीचं नाव आहे प्रिया प्रकाश वरियर. आणि हे दृश्य आहे तिच्या आगामी ओरू अडार लव्ह या मल्याळम चित्रपटातलं. एका शाळेच्या ऑडिटोरियममधलं हे दृश्य आहे. ज्यामध्ये प्रिया एका मुलाकडे पाहून भुवया उडवते. त्यावर तो मुलगाही तिच्याकडे पाहून भुवया उडवतो. यावर प्रिया त्या मुलाला डोळा मारते.

बघायला गेलं तर हा अगदी सामान्य वाटणारा सीन आहे. आपल्याकडे 'शाळा'पासून ते थेट 'सैराट'पर्यंत जवळपास प्रत्येक चित्रपटामध्ये आपल्याला असेच सीन दिसतील. पण ट्विटकऱ्यांच्या काळजाचा ठाव घेतला तो प्रियाच्या (डोळ्यांच्या!) दिलखेचक अदाकारीनेच!

येत्या ३ मार्चला हा चित्रपट रिलीज होत असून ज्या गाण्यातून ही काही सेकंदांची क्लिप काढून व्हायरल करण्यात आली आहे, ते गाणंही हळूहळू लोकप्रिय होऊ लागलं आहे.


आता सोशल मीडियावर कुठली गोष्ट फेमस आणि त्यातही व्हायरल झाली, आणि त्यावर नेटकऱ्यांनी काही जोक्स नाही केले, तरच नवल! तशा प्रियाच्या या व्हिडिओवरही बरेच मीम सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यातले काही तर तिच्या मूळ व्हिडिओ क्लिपइतकेच फेमस झाले आहेत.



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा