Advertisement

प्रियांकाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा


प्रियांकाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
SHARES

अभिनेत्री प्रियंका चोप्रानं बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये सध्या तिच्याच नावाची जोरदार चर्चा आहे. 'क्वांटिको' या मालिकेमुळे प्रियांकानं परदेशी प्रेक्षकांची मनं जिंकली. अभिनय क्षेत्रात तर तिनं झेंडा रोवलाच आहे. यासोबतच तिनं सामाजिक क्षेत्रात देखील पुढाकार घेतला. 'देसी गर्ल'च्या याच समाजसेवेसाठी तिला 'मदर तेरेसा स्मृती' पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे



हार्मनी फाऊंडेशन तर्फे प्रियांकाला पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. प्रियंकाच्या वतीनं तिची आई डॉ. मधु चोप्रा यांनी हा पुरस्कार स्विकारला आहे. प्रियंकाच्या वतीनं मधु चोप्रा यांनी सर्वांचे आभार मानले. एक आई म्हणून मला तिचा फारच अभिमान आहे. ती नेहमीच सर्वांशी प्रेमानं आणि प्रामाणिकपणे वागते.या समाजाला जेवढं द्याल त्याचीच परतफेड म्हणून तुमच्याही वाट्याला बऱ्याच चांगल्या गोष्टी येतील.याचे उदाहरण प्रियंकानं प्रस्थापित केलं आहे, अशा भावना प्रियांकाच्या आईनं व्यक्त केल्या.   



हेही वाचा

अनुष्का-विराटच्या पेहरावाची बातच काही और...


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा