भारत-पाक संबंधांवरुन फिल्मस्टारच टार्गेट का? : प्रियंका

  Pali Hill
  भारत-पाक संबंधांवरुन फिल्मस्टारच टार्गेट का? : प्रियंका
  मुंबई  -  

  मुंबई - भारत आणि पाकिस्तानमधल्या संबंधांवरुन प्रत्येक वेळी फक्त फिल्मस्टार्सनाच टार्गेट का केलं जातं, असा सवाल अभिनेत्री प्रियंका चोप्राने उपस्थित विचारलाय.

  देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आपलं सरकार जी भूमिका घेतं, त्याचा आदर मी करते, पण जेव्हा जेव्हा भारत आणि पाकिस्तानदरम्यान तणाव निर्माण होतो, तेव्हा फक्त कलाकारांनाच का लक्ष्य केलं जातं? असा सवालही तिने उपस्थित केला. दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या विधानाला प्रियंकाने एकप्रकारे पाठिंबाच दिला आहे. उरी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचं समर्थनही प्रियंकाने केलं. पण पाकिस्तानी कलाकारांना बंदी घालून, काहीच साध्य होणार नाही, असंही प्रियंका म्हणाली. आतापर्यंत पाकिस्तानमधल्या कोणत्याही कलाकारामुळे भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण झालेला नाही, त्यामुळे या घटनेसाठी त्या कलाकारांना जबाबदार धरून प्रश्न सुटणार नाहीत, असंही मत प्रियंकाने मांडलं.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.