Advertisement

राधिकाचा हा मेकओव्हर तुम्ही बघितला का?

राधिका-शनाया-गुरूनाथ अशा त्रिकुटाची ही अफलातून स्टोरी हाच या मालिकेचा खरा युएसपी. सध्या मालिकेत राधिकाचा संघर्ष हा गेल्या काही दिवसांपासून खूप वाढला आहे. या निमित्ताने ती एक यशस्वी उद्योजिका म्हणून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

राधिकाचा हा मेकओव्हर तुम्ही बघितला का?
SHARES

'मी कुटून ऱ्हायले, माझ्या नवऱ्याची बायको' असं म्हणत थेट प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेने जवळजवळ वर्षभर प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. अल्पावधीतच ही मालिका लोकप्रिय झाली. राधिका-शनाया-गुरूनाथ अशा त्रिकुटाची ही अफलातून स्टोरी हाच या मालिकेचा खरा युएसपी. सध्या मालिकेत राधिकाचा संघर्ष हा गेल्या काही दिवसांपासून खूप वाढला आहे. या निमित्ताने ती एक यशस्वी उद्योजिका म्हणून प्रेक्षकांसमोर येणार आहे.


#radhikasubhedar #zeemarathiofficial #Mnb #makeover

A post shared by  Anita Date-Kelkar (@anitadate_kelkar) on


आपल्या नवऱ्यावर मनापासून प्रेम करणारी राधिका आता स्वावलंबी झाली आहे. गुरूनाथच्या आयुष्यात आलेली नखरेल शनाया कायमच राधिकाच्या डोक्याला ताप झाली आहे. राधिकाने 'राधिका मसाले' ही स्वत:ची कंपनी सुरू केल्यापासून तिला असंख्य संकटांना सामोरं जावं लागतयं. त्यातच गुरूनाथच्या ऑफिसमधील स्टाफ आता राधिकाच्या बाजूने आला आहे. त्यामुळे आता येत्या काळात 'राधिका मसाले' एक यशस्वी कंपनी म्हणून उदयाला येणार आहे.

नवीन कंपनीसाठी राधिका नवीन ऑफिसही घेणार आहे. यासाठी राधिकाचा मेकओव्हर होणार आहे. आनंद पानवलकर, जेनी, श्रेयस, समिधा आणि रेवती यांच्या सोबतीने ती स्वत:ची कंपनी सुरू करतेय. गुरूला दिलेलं आव्हान राधिका पूर्ण करणार का? नवीन कंपनीमध्ये राधिका यशस्वी होणार का? या सगळ्याची उत्तरं येत्या ३० मार्चला प्रेक्षकांना मिळणार आहेत.



हेही वाचा

'सुपर डान्सर -2'चा विजेता ठरला बिशाल शर्मा


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा