Advertisement

राधाच्या पाठिंब्याने सावरणार नात्याचं भविष्य!


राधाच्या पाठिंब्याने सावरणार नात्याचं भविष्य!
SHARES

कलर्स मराठीवरील 'राधा प्रेम रंगी रंगली' मालिकेमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये बऱ्याचशा घटना घडल्या आहेत. ज्यामुळे मालिका रंजक वळणावर येऊन पोहचली आहे. प्रेम बऱ्याच दिवसांपासून खूप मोठ्या धर्मसंकटात होता. त्याला वाटत होतं की दीपिकाच्या पोटात वाढणारं मुलं हे त्याचं आहे. पण त्याचा हा गैरसमज राधाने दूर केला आहे.


मालिकेत पुढे काय?

आदित्य आणि दीपिकाने सुरू केलेल्या नव्या कंपनीच्या उद्घाटनाच्या दिवशी दीपिकाला कळतं की प्रेम राधाला घटस्फोट देणार नाही. दीपिकाला या सगळ्यामुळे खूप मोठा धक्का बसतो. आणि त्यातच ती आपल्या मुलाला गमावून बसते. दीपिकाच्या आईला मात्र हे सहन होत नाही. त्यातच ते बाळ माधुरीचं मुलगा नसून त्याला तुम्ही दत्तक घेतलं असल्याचं सत्य प्रेमला सांगेन असं म्हणत माधुरी आणि राधाला ती ब्लॅकमेल करण्यास सुरुवात करते. 


प्रेमला हे सत्य कळणार?

प्रेमला हे सत्य राधा कसं सांगणार? कसं प्रेमला यातून सांभाळणार? प्रेम यामधून कसा बाहेर येणार आणि हे सत्य पचवणार? राधा कशाप्रकारे प्रेमचा संसार आणि व्यवसाय सावरणार? या अनेक प्रश्नांची उत्तरं लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहेत.

माधुरीची राधाला तिला खूप भीती वाटत आहे. कारण जेंव्हा प्रेमला ही गोष्ट कळेल की, तो आमचा मुलगा नसून आम्ही त्याला दत्तक घेतलं आहे, तेव्हा तो माझा आई म्हणून कधीच स्वीकार करणार नाही. राधा याबाबतीत पुढाकार घेऊन माधुरीला मदत करण्याचा निर्णय घेते. यामुळेच राधा प्रेमला सत्य सांगते जे ऐकून प्रेम पूर्णपणे खचून जातो. इतक मोठं सत्य का माझ्यापासून लपवून ठेवलं हे त्याला कळत नाही आणि तो घराबाहेर निघून जातो.

राधा प्रेमला यामधून कशी बाहेर काढेल? त्याचा व्यवसाय आणि संसार कसा सांभाळेल? राधा आणि प्रेमचं नातं कुठल्या वळणावर येईल? हे बघणं रंजक असणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा