सी. रामचंद्र यांच्या स्मृतींना उजाळा


  • सी. रामचंद्र यांच्या स्मृतींना उजाळा
SHARE

दादर - जानेवारी महिन्यापासून संगीतकार सी. रामचंद्र यांचं जन्मशताब्दीवर्ष सुरू होतंय. त्या निमित्तानं ट्रिब्यूट टू लिजंड, सी. रामचंद्र या कार्यक्रमाचं रविवारी संध्याकाळी 7 वाजता दादरच्या सावरकर सभागृहात आयोजन करण्यात आलंय. विभावरी आपटे, संगिता मेळेकर, राणा चटर्जी, अजित देवल हे गायक सी. रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेली गाणी सादर करणार आहेत. या कार्यक्रमात अभिनते वैभव मांगले यांचाही विशेष सहभाग असणार आहे.

या कार्यक्रमाची संकल्पना द्वारकानाथ संझगिरी यांची असून, निवेदनसुद्धा संझगिरी करणार आहेत. हा कार्यक्रम रसिक प्रेक्षकांसाठी विनामूल्य आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या