Advertisement

ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचं निधन


ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचं निधन
SHARES

मुंबई - ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचं वयाच्या 66 व्या वर्षी राहत्या घरी निधन झालं. ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे त्यांचं निधन झालं. अष्टपैलू अभिनेता अशी ओम पुरी यांची ओळख होती. 18 ऑक्टोबर 1950 रोजी त्यांचा जन्म झाला होता. त्यांच्या अकाली निधनामुळे चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विटरवरून ओम पुरी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीला धक्का बसला आहे. अनुपम खेर, मधुर भंडारकर, रितेश देशमुख, बोमन इराणी, मोहम्मद कैफ यांनी ट्विटरद्वारे ओम पुरी यांना आदरांजली वाहिली आहे.

ओम पुरी यांनी ३०० हून अधिक चित्रपटात भूमिका केल्या आहेत. घाशीराम कोतवाल चित्रपटाद्वारे त्यांनी अभिनयक्षेत्रात पर्दापण केले होते. आक्रोश हा ओम पुरी यांचा पहिला गाजलेला चित्रपट. केंद्र सरकारने त्यांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानाची दखल घेत त्यांना पद्मश्री पुरस्कारने सन्मानित केले होते. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या १९७३ बॅचचे ते विद्यार्थी होते. अभिनयाबरोबरच त्यांचा भारदस्त आवाज व संवादफेक कौशल्य अप्रतिम होते. अर्धसत्य चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते. ओम पुरी यांनी हॉलीवूडमध्येही आपली छाप सोडली होती.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा