SHARE

बाहुबली 2 या सिनेमाने 1000 कोटींचे कलेक्शन करत इतिहास रचला आहे. आतापर्यंत असा रेकॉर्ड कोणत्याच भारतीय सिनेमाने बनवलं नाही. या सिनेमाने भक्कम कमाई तर केलीच आहे, शिवाय हा सिनेमा समीक्षकांच्या पसंतीसही उतरला आहे.

बॉलिवूड अभिनेता ऋषी कपूरनं या सिनेमासंदर्भात एक ट्विट केलं आहे. ऋषी कपूर हे एक असे अभिनेते आहेत, जे कोणत्या ना कोणत्या वृत्तासाठी नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्यावर आधारित असलेल्या 'खुल्लम खुल्ला ऋषी कपूर अनसेंसर्ड' या आत्मचरित्राचे प्रकाशन झाल्यापासून ते आणखीनच खुलून बोलू लागले आहेत. कधी कटू तर कधी गोड! सध्या त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून बाहुबली 2 या सिनेमाचे कौतुक केले आहे.


pic.twitter.com/lGYpDZR1W0

— Rishi Kapoor (@chintskap) May 7, 2017

ऋषी कपूर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे,‘’ बहु’’-‘’त’’-बली’’, या सिनेमाची बरोबरी करण्यासाठी दुसऱ्या सिनेमांना खुप प्रयत्न करावे लागतील, पण या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर एवढी मोठी कमाई केली आहे, त्याबद्दल खुपच आनंद होत आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या