'आर. के.'ची पुन्हा मुजोरी

Pali Hill, Mumbai  -  

मुंबई - आर. के. स्टुडिओमधल्या बाप्पाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान रणधीर कपूर आणि ऋषी कपूर यांची मुजोरी समोर आलीय. रणधीर कपूर यांनी एका पत्रकाराला तर ऋषी कपूर यांनी पत्रकार आणि चाहत्याला मारहाण केलीय. तसंच प्रतिक्रिया घेण्यासाठी गाडीजवळ गेलेल्या एका पत्रकाराला रणबीरनं धक्का दिलाय. गणपतीची आरती झाल्यानंतर पत्रकाराने रणधीर कपूर यांना प्रतिक्रिया विचारली. मात्र यावर रणधीर कपूर यांनी कोणतंही भाष्य न करता थेट पत्रकाराच्या कानशीलात लगावली. कपूर बंधूंची ही दादागिरी कॅमेरात कॅद झालीय.

Loading Comments