Advertisement

आर्चीचं इंग्रजी कच्चंच! दहावीत मिळाले 59 मार्क


आर्चीचं इंग्रजी कच्चंच! दहावीत मिळाले 59 मार्क
SHARES

'मराठीत सांगितलेलं कळत नसल तर इंग्लिशमध्ये सांगू का?' 'सैराट'मधला आर्चीचा हा डायलॉग चांगलाच गाजला होता. सिनेमात इंग्रजीप्रेम जोरकसपणे दाखवणाऱ्या आर्चीला दहावीला तिच्या या आवडत्या विषयात मात्र कमी मार्क पडले आहेत. आणि तेही मराठीच्या जवळपास अर्धे! 

'सैराट'फेम आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरुनेही इतर शेकडो मुलांप्रमाणेच यंदा दहावीची परीक्षा दिली. अनेक घरांमध्ये तर आपल्या मुलांप्रमाणेच आर्चीला किती मार्क मिळतात याची उत्सुकताही पालकांमध्ये होती. अखेर निकाल लागला आणि आर्चीला 66.40 टक्के गुण मिळाल्याचं स्पष्ट झालं. पण आर्चीचे मार्क मात्र तिच्या 'सैराट'मधल्या पात्राच्या बरोबर उलटे होते. सिनेमात नेहमी इंग्रजी इंग्रजी करणाऱ्या आर्चीला इंग्रजीत चक्क 59 मार्क मिळालेत. आणि त्याउलट मराठीत तिला तब्बल 83 मार्क आहेत!


आर्चीची गुणपत्रिका

  • मराठी - 83
  • हिंदी - 87
  • इंग्रजी - 59
  • गणित - 48
  • विज्ञान - 42
  • समाजशास्त्र - 50

'सैराट' सिनेमामुळे रिंकू राजगुरु लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचली होती. चाहत्यांकडून होणाऱ्या त्रासामुळे ती दहावीच्या वर्गातच बसू शकली नव्हती. तिने 17 नंबरचा फॉर्म भरुन दहावीची परीक्षा बाहेरुन दिली होती. रिंकू राजगुरु अकलूजच्या जिजामाता कन्या विद्यालयात शिकत होती. सिनेमामुळे तुफान प्रसिद्धी मिळालेली ‘आर्ची’ यंदा दहावीत गेली. नववीत तिला 84 टक्के गुण मिळाले होते. 'सैराट' सिनेमा रिलीज झाल्यापासून आर्ची जिथे जाईल तिथे प्रचंड गर्दी जमत होती. त्यामुळे तिला शाळेत जाणेही अवघड झाले होते. त्यामुळे तिने शाळेतून नाव काढून घेतले आणि बाहेरुन फॉर्म भरला होता. एकही दिवस शाळेत न जाऊन देखील आर्चीला दहावीत किती गुण मिळतील यावर सगळ्यांचेच लक्ष लागून राहीले होते.पण शाळेचा एकही दिवस न भरत आणि शुटिंगमध्ये व्यस्त राहूनही रिंकूने दहावीत 66.40 मिळवले याचं सगळ्यांकडूनच कौतुक होत आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा