Advertisement

'सल्लू की शादी'ला तुम्ही येणार ना?


'सल्लू की शादी'ला तुम्ही येणार ना?
SHARES

सलमान खान केव्हा लग्न करणार? हा सर्वांनाच सतावत आहे. पण खरं सांगायचं तर याचं उत्तर आमच्याकडे तक नाहीच नाही. पण याचं उत्तर सलमान खानकडे पण नसेल. पण याच विषयावर आधारित एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ८ डिसेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या स्टोरीप्रमाणेच त्याचं नाव देखील हटके आहे. 'सल्लू की शादी' असं या चित्रपटाचं नाव असून याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला.



'सल्लू की शादी' चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. या चित्रपटामुळे सलमान खानच्या लग्नाची चर्चा पुन्हा सुरू होईल. 'सल्लू की शादी' चित्रपटाच्या पोस्टरमध्ये एका नवऱ्या मुलीचा हात आणि नवऱ्या मुलाचा हात दाखवण्यात आला आहे. सलमानच्या हातात आहे तसंच ब्रेसलेट मुलाच्या हातात दिसत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मोहम्मद अंसारी यांनी केलं आहे. आलिया नावाच्या मुलीभोवती चित्रपटाची कथा फिरते. आलियाला फक्त सलमान खानशीच लग्न करायचं असतं.


'सल्लू की शादी' या चित्रपटात अनेकजण "भाईजान की शादी नही होती तब तक में शादी नाही करूंगा" असं बोलताना दिसत आहेत. शिवाय ट्रेलरमध्ये सलमान खानचा आवाज देखील आहे. "८ डिसेंबरला लग्न आहे मी येतोय," सलमानच्या आवाजातील हा डायलॉग ट्रेलरमध्ये ऐकू येतोय. चित्रपटात सलमान दिसणार की नाही याबद्दल कुठलीच माहिती मिळाली नाही. शिवाय चित्रपटात मुख्य भूमिका कोणता अभिनेता करणार आहे, हे गूपित ठेवण्यात आलं आहे. ट्रेलरमध्ये देखील त्याचा चेहरा दाखवण्यात आला नाही. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा