सलमानचा जुडवा वरूण साकारणार

 Bandra
सलमानचा जुडवा वरूण साकारणार

मुंबई - दिग्दर्शक डेविड धवन आणि निर्माता साजिद नडियाडवाला यांच्या 'जुडवा-2' या चित्रपटाचे शुटींग सुरू झाले आहे. 20 वर्षांपूर्वी 'जुडवा' हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. आता 'जुडवा'2 प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अभिनेता वरुण धवन या चित्रपटात दुहेरी भुमिकेत दिसणार आहे. या चित्रपटांत त्याच्यासोबत जॅकलीन फर्नांडिस आणि तापसी पन्नू दिसणार आहेत. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा सलमान 29 वर्षांचा होता तेव्हा 'जुडवा' सिनेमा तयार होत होता आणि आता वरुण 29 वर्षांचा आहे. शिवाय हा सिनेमा 29 सष्टेंबरलाच प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे 29 आणि 'जुडवा'चं नातं घट्ट आहे असं म्हणायला हरकत नाही.

'जुडवा'चे दिग्दर्शक डेविड धवन यांनी सलमान खान आणि निर्माता साजिदसोबत काम केलं आहे. दरम्यान निर्माता साजिद नाडियाडवालाने आपण या नवीन निर्मितीसाठी उत्साही असल्याचे सांगितले. वरुणही या सिनेमाबाबत खूप उत्साही असल्याचे त्याने सांगितले. चित्रपटाच्या शुटींगची सुरुवात मुंबईत होणार आहे. त्यानंतर एप्रिल आणि मे महिन्यात लंडनमध्ये शुटींग होणार आहे.

Loading Comments