Advertisement

शाहरुख आणि आमिरला मागे टाकत दबंग खाननं मारली बाजी


शाहरुख आणि आमिरला मागे टाकत दबंग खाननं मारली बाजी
SHARES

अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पण त्याच्या चित्रपटामुळे नाही तर त्याच्या वर्षभरातील कमाईमुळे. 'फोर्ब्स इडिया'नं जाहीर केलेल्या यादीत सलमान खाननं शाहरुख खान आणि आमिर खानला देखील मागं टाकलं आहे. सर्वाधिक कमाई करणाऱ्या १०० भारतीय सेलिब्रिटींची यादी 'फोर्ब्स'नं जाहीर केली. या यादीत दबंग खान म्हणजेच सलमाननं पहिलं स्थान पटकावलं आहे.



यावर्षी सलमाननं एकूण २३२.८३ कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे श्रीमंत सेलिब्रिटींच्या यादीत तो पहिल्या स्थानावर आहे. शाहरुख खान, आमिक खान आणि अक्षय कुमार यांना देखील सलमाननं पछाडलं आहे. पहिल्या स्थानावर सलमान तर शाहरुख खान दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. शाहरुख खाननं यावर्षी १७൦.५൦ कोटी वार्षिक कमाई केली आहे. त्यापाठोपाठ भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली तिसऱ्या स्थानावर कायम आहे. विराटनं १൦൦.७२ कोटी रुपये इतकी कमाई केली आहे.



या यादीत चौथ्या स्थानावर अक्षय कुमार, पाचव्या स्थानी सचिन तेंडुलकर, सहाव्या स्थानी आमिर खान, सातव्या स्थानी प्रियंका चोप्रा, आठव्या स्थानी महेंद्र सिंह धोनी, नवव्या स्थानी हृतिक रोशन, दहाव्या स्थानी रणवीर सिंग, अकराव्या स्थानी दीपिका पदुकोण या सेलिब्रिटींच्या नावाचा यादीत उल्लेख आहे.


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा