Advertisement

संजयचा वाढदिवस आणि वेबसाइटचा मुहूर्त


संजयचा वाढदिवस आणि वेबसाइटचा मुहूर्त
SHARES

फिल्ममेकर संजय जाधवचा १८ जुलैला वाढदिवस असतो. मित्र-मंडळींसोबत वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करण्यासाठी संजय प्रसिद्ध आहे. यंदाच्या वाढदिवसाचं औचित्य साधत संजयने आपली स्वत:ची वेबसाईटही लाँच केली आहे.

वाढदिवसाच्या दिवशी संजयला त्याच्या मित्रमंडळी आणि चाहत्यांकडून भरपूर गिफ्ट्स मिळतात. यंदा मात्र संजयच्या टिमने म्हणजे एक प्रकारे संजयनेच आपल्या चाहत्यांना वेबसाईटच्या रुपात आपल्या चाहत्यांना रिटर्न गिफ्ट दिलं आहे. संजयच्या संपूर्ण कारकिर्दीचा आढावा घेणारी imsanjayjadhav.com ही वेबसाइट त्याने लाँच केली आहे.


'टिमसाठी खूप मोठा सण'

संजयच्या टिमने ही वेबसाइट त्यांना वाढदिवसाची भेट दिली आहे. याविषयी संजयच्या ‘दुनियादारी’, ‘तू ही रे’, ‘प्यारवाली लव्हस्टोरी’ आणि ‘गुरू’ या सिनेमांचे निर्माते आणि बिजनेस पार्टनर दिपक राणे म्हणाले की, संजयदादांचा वाढदिवस हा आमच्या पूर्ण टिमसाठी खूप मोठा सण असतो. त्यामुळे त्यांच्यासाठी काहीतरी खास करण्याची इच्छा होती. या भावनेतूनच टिमने यंदा त्यांना ही वेबसाइट भेट दिली आहे. ही वेबसाईट त्यांच्या चाहत्यांनाही खूप आवडेल.


'हे माझ्यासाठी सरप्राइज'


वाढदिवसाचं औचित्य आणि वेबसाईटचं लाँचिंग याबाबत संजय म्हणाला की, ही वेबसाइट माझ्यासाठी सरप्राइज होतं. वाढदिवसाच्या दिवशी सकाळी उठल्यावर हा सुखद आश्चर्याचा धक्का मिळाला. हा आनंद व्यक्त करायला मला शब्द अपुरे पडत असल्याचंही संजय म्हणाला.


संजयने काला डान्स

वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच १७ जुलैला टिमने आयोजित केलेल्या सरप्राइज पार्टीमध्ये संजयने पोस्टर फाडून एंट्री केली. त्यानंतर ‘राम लखन’ या सिनेमातील ‘मेरा नाम है लखन...’ या गाण्यावर ताल धरत डान्सही केला. यावेळी संजयच्या टिमने त्याच्या गळ्यात पैशांच्या माळाही घातल्या.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा