Advertisement

शास्त्रीय गायनाची मैफील रंगली


शास्त्रीय गायनाची मैफील रंगली
SHARES

दादर - दादर माटुंगा सांस्कृतिक कला केॆद्रात रविवारी संजीव चिम्मलगी यांच्या शास्त्रीय गायनाची मैफील रंगली. यावेळी विश्वनाथ शिरोडकर यांनी तबलावादन आणि सीमा शिरोडकर यांनी पेटीवर चिम्मलगी यांना साथ दिली.
दादर माटुंगा सांस्कृतिक कला केंद्रात गेली 63 वर्षे नियमाने प्रत्येक महिन्याला शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. या कार्यक्रमांचे आयोजन काही संस्था आणि माटुंगा सांस्कृतिक कला केंद्राच्यावतीने केले जाते. यावेळी संजीव चिम्मलगी यांच्या शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिकांसोबत तरुण मंडळीही उपस्थिती होती.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा