Advertisement

ज्येष्ठ रंगकर्मी हेमू धर्माधिकारी यांचं निधन

पेशाने शास्त्रज्ञ असलेले डाॅ. हेमू अधिकारी यांनी मराठी रंगभूमी, सिनेमा तसंच मालिकांमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. ते लोकविज्ञान, अण्वस्रविरोधी शांतता चळवळीतील एक क्रियाशील कार्यकर्ते होते. डाॅ. अधिकारी मुख्यत्वेकरून विवेकशील वैज्ञानिक दृष्टिकोनासाठी ओळखले जात.

ज्येष्ठ रंगकर्मी हेमू धर्माधिकारी यांचं निधन
SHARES

ज्येष्ठ कलावंत आणि शास्त्रज्ञ डॉ. हेमू अधिकारी यांचं सोमवारी सायंकाळी शिवाजी पार्क येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झालं. ते ८१ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असं कुटुंब आहे.

पेशाने शास्त्रज्ञ असलेले डाॅ. हेमू अधिकारी यांनी मराठी रंगभूमी, सिनेमा तसंच मालिकांमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. ते लोकविज्ञान, अण्वस्त्रविरोधी शांतता चळवळीतील एक क्रियाशील कार्यकर्ते होते. डाॅ. अधिकारी मुख्यत्वेकरून विवेकशील वैज्ञानिक दृष्टिकोनासाठी ओळखले जात.



प्रायोगिक तसंच व्यावसायिक रंगभूमीवरील मोठं नाव असलेल्या डाॅ. अधिकारी यांनी ४५ नाटके, १६ मराठी आणि हिंदी चित्रपट तसंच ७ टीव्ही मालिकांमध्ये अभिनय केला आहे.

'डिटेक्टिव्ह नानी', 'लगे रहो मुन्नाभाई' आणि 'वजूद' या हिंदी सिनेमांसोबतच 'जुलूस', 'संध्याछाया', 'हसवा फसवी' हे नाटके तसंच 'स्टार बेस्टसेलर्स फर्स्ट किल' या टीव्ही मालिकेतील त्यांचा अभिनय प्रेक्षकांच्या नक्कीच लक्षात राहील.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा