Advertisement

शाहरुख खान अहमदाबादमधील रुग्णालयात दाखल

अभिनेता शाहरुख खानची प्रकृती खालावली असून उपचार सुरू आहेत.

शाहरुख खान अहमदाबादमधील रुग्णालयात दाखल
SHARES

उष्माघातामुळे बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची प्रकृती खालावली असून उपचारांसाठी त्याला अहमदाबादमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. इंडियन प्रीमियर लीगमधील शाहरुख खानच्या मालकीचा संघ कोलकाता नाईट रायडर्स यंदा प्लेऑफमध्ये दाखल झाला आहे.

डिहायड्रेशनमुळे (शरिरातील पाण्याच्या कमतरतेमुळे होणारा विकार) त्याची प्रकृती खालावल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील क्वालिफायर सामना (आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील पहिला क्वालिफायर सामना) मंगळवारी, 21 मे रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आला.

हा सामना पाहण्यासाठी आणि आपल्या संघाला पाठिंबा दर्शवण्यासाठी शाहरुख खान अहमदाबादच्या स्टेडियमवर हजर होता. या सामन्यानंतर शाहरुखची तब्येत बिघडली होती. प्राथमिक उपचारांनंतरही त्याला बरं वाटलं नाही. त्यामुळे त्याला अहमदाबादमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

अहमदाबादमध्ये गेल्या दोन दिवसांपासून उन्हाचा पारा ४० अंशांचा पुढे गेला आहे. देशभरात अनेक ठिकाणी अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे अनेक रुग्णालयांमध्ये उष्माघाताचे रुग्ण उपचार घेत असल्याचं पाहायला मिळत आहे



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा