Advertisement

शेखर सुमनचं ट्रान्स्फर्मेशन!


शेखर सुमनचं ट्रान्स्फर्मेशन!
SHARES

वय वाढलं, तरीही फिट अँड फाइन मस्त पर्सनॅलिटी असलेले बॉलीवुड मधले काही कलाकार कोणते? असा प्रश्न कुणी विचारला, तर काही कलाकारांची नावं आवर्जून घेतली जातात. ज्यात शाहरुख खान, सलमान खान यांचं नाव असतंच. पण आता ५४ वर्षांचा अभिनेता आणि होस्ट शेखर सुमन सध्या आपल्या फिटनेसवर जास्त काम करतोय असं दिसतंय. जिममध्ये बायसेप्स बनवितानाचे त्याचे काही फोटोज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये शेखर जिममधील एका मशीनवर बसलेला दिसत आहे.

 


या फोटोत शेखर सुमन यांचं ट्रान्स्फर्मेशन पाहायला मिळतंय. हे सर्व फोटो शेखरचा मुलगा अध्ययन सुमन याने क्लिक केले आहेत. शेखर सुमनला सिनेमांपेक्षा टेलिव्हिजनवर प्रेक्षकांकडून चांगलीच पसंती मिळाली होती. काही महिन्यांआधीच 'भूमी' या सिनेमात शेखर सुमनने काम केलं होतं. त्या सिनेमाला खूप बॉक्स ऑफिसवर फारसं यश मिळालं नाही. पण शेखरचं काम मात्र प्रेक्षकांना आवडलं.

 


त्याने सब टीव्हीवरील ‘मूवर्स अ‍ॅण्ड शेखर्स’ हा शो होस्ट केला. या शोने त्याला  छोट्या पडद्यावर एक वेगळीच ओळख निर्माण करून दिली. त्याचबरोबर ‘कॉमेडी सुपरस्टार, लाइफ इंडिया लाइफ, द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ हे शोदेखील त्याने होस्ट केले आहेत. शेखर सुमनच्या या फोटोंचे त्याच्या फॅन्सकडून कौतुक होताना पाहायला मिळत आहे.



हेही वाचा

'तारक मेहता...' मालिकेतील 'या' अभिनेत्रीचेही झाले होते लैंगिक शोषण


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा