• सलमानचा बॉडीगार्ड अटकेत
SHARE

वांद्रे - मुंबई पोलिसांनी सलमान खानचा बॉडीगार्ड शेराला एका व्यक्तीला मारहाण केल्याप्रकरणी अटक केलीय. पोलिसांनी शेराला घरातूनच अटक केली. त्यानं पीडित व्यक्तीला जोरदार मारहाण केली, ज्यात त्याच्या मानेचं हाड तुटलं. याशिवाय त्याला बंदूक दाखवून धमकावण्याचा प्रयत्नही करण्यात आला, अशी तक्रार पोलिसांत दाखल झाली होती. आता शेराला अटक करून त्याच्यावर अंधेरीतल्या डी.एन.नगर पोलीस ठाण्यात कलम 323 आणि 326 अन्वये गु्न्हा दाखल करण्यात आलाय.

संबंधित विषय
ताज्या बातम्या