शॉर्टफिल्म महोत्सवाचं आयोजन

 Malad West
शॉर्टफिल्म महोत्सवाचं आयोजन
शॉर्टफिल्म महोत्सवाचं आयोजन
See all
Malad West, Mumbai  -  

दादर - युनिव्हर्सल मराठीतर्फे माय मुंबई शॉर्टफिल्म महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. यासाठी देशविदेशातून अर्ज मागवण्यात आल्यात आणि याला उत्सफुर्त प्रतिसादही मिळतोय. जर्मनी, अर्जेंटिना, रशिया, बांगलादेश, इराक, यूएई, उझबेकिस्तान, कोलंबिया, फ्रान्स, युनायटेड किंग्डम अशा अनेक देशांमधून अर्ज आलेत. या महोत्सवासाठी शॉर्ट फिल्मची वर्गवारी करण्यात आलीय. त्यामध्ये सामाजिक जनजागृती, अॅनिमेशन फिल्म, मोबाईल शूट फिल्म, अॅडफिल्म, म्युझिक व्हिडिओ आणि डॉक्युमेंटरी अशाप्रकारे वर्गवारी करण्यात आलीय. विनामूल्य ऑनलाईन अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख 15 नोव्हेंबर आहे. तर डिव्हीडी पाठविण्याची अंतिम तारीख 20 नोव्हेंबर आहे.

रविंद्र नाट्य मंदिरात लवकरच या महोत्सवाचं आयोजन करण्यात येणाराय. या महोत्सवाची तारीख www.mymumbaishortfilmfestival.com या वेबसाईटवर देण्यात येईस. तसंच वेबसाईटवर जाऊन नाव नोंद करणं आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी ९७६८९३०८५३ / ९८३३०७५७०६ या क्रमांकावर संपर्क साधावा, अशी माहिती युनिव्हर्सल मराठीचे सरचिटणीस अमितराज निर्मल यांनी दिली.

Loading Comments