Advertisement

गायिका कविता राम का झाली नाराज?


गायिका कविता राम का झाली नाराज?
SHARES

मराठी असो वा हिंदी या दोन्ही सिने इंडस्ट्रीमध्ये स्पर्धा वाढली आहे. या क्षेत्रात आपला ठसा उमटवण्यासाठी प्रत्येक कलाकार चिकाटीने काम करताना दिसत आहे. अशातच कलाकाराला कामाचं श्रेय न मिळाल्यास साहाजिकच वाईट वाटणार. असंच काहीसं घडलय ते गायक कविता राम हीच्या बाबतीत.


फेसबुकद्वारे मांडली व्यथा

गायक कविता राम हीने याबाबत फेसबुकच्या माध्यमातून आपली खंत व्यक्त केली आहे. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'नगरसेवक' या सिनेमातील 'हळद लागली' या गाण्यासाठी कविता यांनी पार्श्वगायनं केलं होतं. पण अधोरेखित करण्यासारखी बाब म्हणजे सिनेमाचे निर्माते, म्युझिक कंपनी आणि म्युझिक डायरेक्टर यांनी या गाण्याचं श्रेय कविता यांना दिलंत नाही. तसेच कुठेही कविता यांच्या नावाचा उल्लेखही केला नाही. त्यामुळे कविता राम यांना ही बाब नाईलाजाने फेसबुकच्या माध्यमाने सर्वांसमोर मांडावी लागली.

कविता यांनी 'ये रिश्ता क्या कहलाता है', 'गोदभराई', 'मेरे घर आयी नन्हीं परी', 'कैरी', 'साथ निभाना साथिया', या मालिकांसाठी तर 'या टोपीखाली दडलंय काय', 'लाज राखते वंशाची', 'दुर्गा म्हणत्यात मला', 'शिनमा', 'थँक यू विठ्ठला', 'हक्क' 'लादेन आला रे' यांसारख्या मराठी तर 'गब्बर इज बॅक', 'सिंग इज किंग' या हिंदी सिनेमांसाठी गाणी गायली आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा