Advertisement

'या' मराठी गायिकेचं अकाऊंट झालं हॅक


'या' मराठी गायिकेचं अकाऊंट झालं हॅक
SHARES

कलाकारांचे सोशल मीडिया अकाऊंट हॅक होण्याचे प्रकार वारंवार होत असतात. काही दिवसांपूर्वी बॉलिवूड कलाकार अनुपम खेर, अभिषेक बच्चन यांचं ट्विटर अकाऊंट हॅक झालं होतं. तुर्किश आर्मी ग्रुपने त्यांचं अकाऊंट हॅक केलं होते. त्यातच आता मराठी गायिका सावनी रवींद्र हीचं सोशल मीडिया अकाऊंट हॅक करण्यात आलं आहे. 'तू मला, मी तुला' या गाण्याला लाभलेल्या गोड आवाजामुळे सावनी सगळ्यांची फेव्हरेट गायिका झाली. 


सावनीने केली तक्रार

गुरुवारी सकाळी सावनी खडबडून जागी झाली, जेव्हा तिने ई-मेल वाचले, ज्यात तिचा अकाउंट हॅक झाल्याचा उल्लेख होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सावनीचं फेसबुक पेज आधल्या रात्रीच हॅक झालं होतं, पण रात्रं असल्यामुळे ते तिच्या लक्षात आलं नाही. आपलं फेसबुक पेज कोणीतरी हॅक केल्याचं सावनीला समजताच, तिने ताबडतोब फेसबुकच्या मुख्य कार्यालयात आपली तक्रार नोंदवली. सुदैवाने, हॅकरने काहीही पोस्ट केले नाही आणि आता खाते नवीन पासवर्डसह सुरक्षित केले गेले आहे.

सिलेब्रिटी अकाउंट्स हॅक होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. काही महिन्यांपूर्वी माझ्या एका मैत्रिणीचा अकाउंट हॅक झाला होता. तिचं नाव बदलण्यात आलं होतं. नशिबाने माझ्या बाबतीत असा अनुचित प्रकार घडला नाही. पण हे खरोखरच भयानक आहे. अाशा आहे, याच्यापुढे असं होणार नाही. मी आधीच संबंधित लोकांकडे याची नोंद केली आहे आणि मला खात्री आहे की हॅकर लवकरच पकडला जाईल.
- सावनी रविंद्र, गायिका

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा