Advertisement

'मुंबईत राहूनही मराठी येत नाही', कपिल शर्माला सोनालीनं सुनावलं

सोनी टीव्हीवर 'द कपिल शर्मा' कार्यक्रमात मुख्य भुमिकेत असलेल्या कपिल शर्माला पुन्हा एकदा मराठीच्या मुद्द्यावरून बोलणं ऐकून घ्यावं लागलं आहे.

'मुंबईत राहूनही मराठी येत नाही', कपिल शर्माला सोनालीनं सुनावलं
SHARES

सोनी टीव्हीवर 'द कपिल शर्मा' कार्यक्रमात मुख्य भुमिकेत असलेल्या कपिल शर्माला पुन्हा एकदा मराठीच्या मुद्द्यावरून बोलणं ऐकून घ्यावं लागलं आहे.

'द कपिल शर्मा शो' मध्ये 'व्हिसलब्लोअर'मधील स्टारकास्ट अभिनेता रवि किशन, सचिन खेडेकर आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी हजेरी लावली होती. यावेळी सोनालीनं मुंबईत राहून देखील मराठी येत नाही. यावरून कपिल शर्माला खडसावले आहे.

शोचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर टाकण्यात आला आहे. त्यात कपिल शर्मा रवि किशन, सचिन खेडेकर यांचे स्वागत करतो. त्याचबरोबर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचेही स्वागत करतो. 'अनेक चित्रपटांमध्ये काम करूनही मला या शोमध्ये येण्याची कधी संधी मिळाली नाही', असं सोनाली कपिल शर्माला म्हणाली. त्यावर कपिल म्हणाला की, 'तू या शोमध्ये आली हे आमचे भाग्य आहे.'

त्यानंतर सोनालीनं कपिलला मराठी भाषेत प्रश्न विचारला. "तु फक्त हिंदी इंग्रजीत बोलतो, मराठीतही बोल थोडं. मुंबईत राहतोस, इतके चांगले अभिनेते आहेत. आमच्याशी मराठीत बोलत नाहीस. जिथे आपण राहतो ती भाषा यायला पाहिजे की नाही?", असं सोनाली त्याला विचारते.

सोनालीच्या या प्रश्नावर कपिल शर्माने पंजाबी भाषेतून सोनालीला उत्तर दिले आहे. "तू इतक्या वेळापासून बोलतच आहे. मला बोलायची संधीच मिळत नाहीए", असं कपिल सोनालीला म्हणाला.संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा