राहतच्या गाण्याला डच्चू

 Pali Hill
राहतच्या गाण्याला डच्चू
Pali Hill, Mumbai  -  

मुंबई - पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या उरी हल्ल्यानंतर त्याचे परिणाम कलाविश्वातही दिसू लागले आहेत. पाकिस्तानी कलाकारांना मोठ्या प्रमाणावर विरोध होऊ लागला आहे. त्याच पार्श्वभूमीवर निर्माता टी. पी. अग्रवाल यांनी पाकिस्तानी संगीतकार राहत फतेह अली खान यांचं गाणंच त्यांच्या चित्रपटातून काढलंय. 'लाली की शादी में लड्डू दीवाना' या चित्रपटात राहत फतेह अली खान यांनी रोमँटिंक गाण्याला आपला आवाज दिला होता. "उरीमध्ये झालेल्या हल्ल्याची पाकिस्तान कलाकारांनी साधी दिलगिरी पण व्यक्त केली नाही, म्हणून राहत फतेह अली खान यांचं गाणं चित्रपटातून काढलं," असं टी. पी. अग्रवाल यांनी स्पष्ट केलं. 

Loading Comments