'स्पायडर मॅन' बोलणार मराठीत!

  Mumbai
  'स्पायडर मॅन' बोलणार मराठीत!
  मुंबई  -  

  मुंबई - 'स्पायडर मॅन' एक असं कॅरेक्टर जे लहानापासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच परिचयाचं आहे. 'स्पायडर मॅन' माहित नाही असं कुणी असूच शकत नाही. जगभरात 'स्पायडर मॅन' हा चांगलाच लोकप्रिय आहे. टोबी मॅग्वॉयर, अँड्र्यू गारफिल्ड या अभिनेत्यांनी रंगवलेल्या ‘स्पायडर मॅन’ला हिंदुस्थानसह जगभरात तुफान लोकप्रियता मिळाली. आतापर्यंत 'स्पायडर मॅन' आपण इंग्लिश बोलताना पाहिला होता. पण आता हा 'स्पायडर मॅन' चक्क मराठीतून बोलणार आहे. मराठीतून? थोडे अवाक झालात ना हे ऐकून. टॉम हॉलंडने जिवंत केलेल्या ‘स्पायडर मॅन- होमकमिंग’चा अधिकृत मराठी ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये ‘स्पायडर मॅन’सह सगळ्या व्यक्तिरेखा नेहमीच्या अस्खलित इंग्रजीऐवजी चक्क मराठीत बोलत आहे.

  ‘स्पायडर मॅन- होमकमिंग’चा अधिकृत ट्रेलर मराठी, हिंदी, तमीळ, तेलुगू, गुजराती, मल्याळम, पंजाबी, भोजपुरी, कन्नड आणि बंगाली अशा दहा भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय चित्रपटाचे निर्माते असलेल्या ‘सोनी पिक्चर्स’ने घेतला आहे. ७ जुलै रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.