Advertisement

Squid Game चा दुसरा सिजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, पहा पहिली झलक

आता या सीरिजचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Squid Game चा दुसरा सिजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, पहा पहिली झलक
SHARES

दक्षिण कोरियन सीरिज स्क्विड गेमने Squid Game जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळवली आहे. ही सीरिज रिलीज झाल्याच्या काही दिवसातच,नेटफ्लिक्सच्या सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या शोपैकी एक बनली आहे.

प्रीमियर झाल्यापासून सीरिज अनेक देशांमध्ये पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत होती. या सीरिजच्या दुसऱ्या सीझनची प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षा करत होते. आता या सीरिजचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘स्क्विड गेम-2’ लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. मालिकेचे लेखक, दिग्दर्शक, निर्माता आणि निर्माता ह्वांग डोंग-ह्युक यांनी पुष्टी केल्यानंतर नेटफ्लिक्सने ही घोषणा केली आहे आणि ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

नवीन सीझन येणार त्याची घोषणा, लेखक,निर्माता आणि निर्माता Hwang Dong-Hyuk यांनी या विषयी सांगितल्यानंतर, नेटफ्लिक्सने ही घोषणा केली आहे आणि ही आनंदाची बातमी चाहत्यांशी शेअर केली आहे.

नेटफ्लिक्सने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून या सीरिजची घोषणा केली आहे. ‘रेड लाइट … ग्रीन लाइट! स्क्विड गेम ऑफिशियली सीझन २ घेऊन परत येत आहे. यासोबतच त्यांनी आणखी एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी दिग्दर्शक Hwang Dong-Hyuk यांचं एक पत्र शेअर केलं आहे.

या पत्रात ‘नवीन सीझन परत येत आहे. स्क्विड गेमचा पहिला सीझन आणण्यासाठी १२ वर्षे लागली. पण ती Netflix ची आतापर्यंतची सर्वात लोकप्रिय मालिका बनण्यासाठी फक्त १२ दिवस लागले.हेही वाचा

केके यांच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावरील जखमांबद्दल मोठा खुलासा

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा