एका सेल्फीत दोन खान!

 Mumbai
एका सेल्फीत दोन खान!
Mumbai  -  

मुंबई - गेल्या काही दिवसांमध्ये आमिर आणि शाहरूख यांच्यातला वाद वाढल्याचं समोर आलं होतं. मात्र अभिनेता शाहरुख खान आणि आमीर खान यांनी नुकताच सोबत सेल्फी काढला आहे. मात्र, या वादाला छेद देत शाहरुख आणि आमीरने सेल्फी काढला आहे. दुबईतील एका बर्थडे पार्टीत दोघेही हजर होते. या पार्टीत असं काही घडलं, जे गेल्या 25 वर्षात घडलं नव्हतं.

शाहरुखने आमीरसोबत सेल्फी काढून, तो ट्विटरवर शेअर केला. इतकंच नाही, तर शाहरुख म्हणतो, “आम्ही एकमेकांना गेल्या 25 वर्षांपासून ओळखतो, मात्र पहिल्यांदाच सोबत फोटो काढत आहोत." या वेळी अजय बिजली यांच्यासोबत शाहरुख आणि आमीरचा फोटो दिग्दर्शक करण जोहरने ट्विट केला आहे.

Loading Comments