चॅरिटी अवॉर्ड्स नाईट्सचे आयोजन

 Nariman Point
चॅरिटी अवॉर्ड्स नाईट्सचे आयोजन

नरिमन पॉईंट येथील स्टॅंडर्ड चार्टर्ड मुंबई मॅरेथॉनच्या वतीनं गुरुवारी संध्याकाळी चॅरिटी अवॉर्ड्स नाईट्सचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात देशभरातील समाजामध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या संस्थांना सन्मानित करण्यात आले. 

समाजात विविध स्तरावर कामगिरी करण्याऱ्या संस्थांना त्यांच्या कामगिरी अनुसार अवॉर्ड्स देण्यात आले. यात प्रथम क्रमांक श्रीमद राजचंद्र लव्ह अँड केयरला तर दुसरा क्रमांक इशा विद्या आणि तिसरा क्रमांक अमर सेवा संघाम या संस्थेने पटकावला.

या कार्यक्रमाला राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, भाजपा प्रवक्त्या शायना एन.सी. त्याचसोबत बॉलीवुड कलाकार राहुल बोस, गुल पनाग आणि तारा शर्मा उपस्थित होते. 

Loading Comments