Advertisement

ठाण्यात रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो


ठाण्यात रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो
SHARES

अनेक हरहुन्नरी कलावंत हे यू ट्युबसारख्या माध्यमांमुळे पुढे आले आहेत. यामुळे ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ क्षेत्रातील कलाकारांना मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळत आहे. यूट्युबचा बोलबाला वाढला तरीही लाइव्ह शोची गंमत कमी झालेली नाही. हेच ओळखून ‘न्यू नेस्ट’ या संस्थेने विनोदाची फटकेबाजी करणारा ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो रसिकांसाठी आयोजित केला आहे.


धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो

‘भारतीय डिजिटल पार्टी’ म्हणजे ‘भाडिपा’ या मराठमोळ्या ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ चॅनलने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या ‘भाडिपा’चा ‘मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर आणि परप्रांतीय’ हा धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो शुक्रवारी २७ एप्रिलला ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे रात्री ८.३० वा रंगणार आहे. ज्योती सावंत आणि स्टीफन कैराना यांनी गुणी कलावंतांना व्यासपीठ देण्याच्या उद्देशाने ‘न्यू नेस्ट’ या संस्थेची स्थापना केली आहे.

सोशल मीडियावर लोकप्रिय असणारे सारंग साठे, चेतन मुळ्ये, मंदार भिडे, आणि ओमकार रेगे हे ४ विनोदवीर या शो चं सादरीकरण करणार आहेत.


कलाकारांचा विनोदी ढंग

प्रत्येक शहराची तसेच तिथल्या माणसांची एक खासियत असते. हीच खासियत विनोदी ढंगात अनुभवण्याची मजा या शोमधून प्रेक्षकांना मिळणार आहे. या संकल्पनेबद्दल बोलताना ज्योती सावंत आणि स्टीफन कैराना सांगतात, सोशल मीडियावरील या विनोदवीरांना घेवून अशा प्रकारचा लाइव्ह शो करण्याची कल्पना वेगळी असली तरी प्रेक्षक या ‘शो’ चे नक्कीच स्वागत करतील, असा विश्वास या दोघांनी व्यक्त केला.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा