Advertisement

स्वप्नील जोशीचं छोट्या पडद्यावर पुन्हा कमबॅक


स्वप्नील जोशीचं छोट्या पडद्यावर पुन्हा कमबॅक
SHARES

अभिनेता स्वप्नील जोशी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे. आजवर अनेक मालिकांमधून प्रेक्षकांसमोर आलेल्या स्वप्नीलच्या प्रत्येक मालिकेतील व्यक्तीरेखांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेमही केलं. आता स्वप्नील पुन्हा छोट्या पडद्यावर दिसणार म्हटल्यावर त्याच्या चाहत्यांना नक्कीच आनंद झाला असणार.

खरंतर छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा कमबॅक करत असल्याची माहिती स्वप्नीलने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना दिली आहे. त्याचा 'No 1 यारी विथ स्वप्नील' हा नवीन रिअॅलिची शो कलर्सवर सुरू होत आहे. या शोचं सूत्रसंचालन स्वप्नील जोशी करणार आहे. हा शो १८ फेब्रुवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमाचा प्रोमो स्वप्नीलने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.

स्वप्नीलने वयाच्या नवव्या वर्षी आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली, आणि नंतर त्याने मागे वळून पाहिलेच नाही. आजवर त्याने दुनियादारी, मुंबई- पुणे- मुंबई, भिकारी असे अनेक हिट चित्रपट दिले. सध्या तो मुंबई-पुणे-मुंबई ३ च्या चित्रिकरणात व्यस्त आहे. याआधी कलर्स मराठीवर 'कोण होणार मराठी करोडपती' या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन स्वप्नीलने केलं होतं. त्यावेळी त्याचे खूप कौतुकही झालं. आता पुन्हा एकदा स्वप्नील सूत्रसंचालन करण्यासाठी सज्ज झाला आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा